Ready Set Go


सी. एम. पुराणिक पूर्व प्राथमिक विभाग

प्रवेशाच्या चौकशीसाठी खालील लिंकवर क्लिक करा


वार्षिक अहवाल

पालकांशी हितगुज

आमची ध्येये आणि उद्दिष्टे

आयुष्यातील सुंदर असा बालपणाचा काळ शाळेत घालवणारे ही मुले केवळ पुस्तकी किडा न होता सर्वार्थाने सुसंस्कृत विद्यार्थी आणि आदर्श नागरिक कसे होतील असा विचार करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही विशेष नियोजन बद्ध आखणी करून अभ्यासक्रम तयार केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रकल्पांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये सामाविष्ट केले जाते.

सकारात्मक विचार, आत्मविश्वास विकसित करण्यासाठी तसेच आपले विचार व्यक्त करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी, आपल्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी, साधेपणा, आदर, नम्रता, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन याकरिता दर्जेदार शिक्षण प्रदान करणे, एक आदर्श व्यक्तिमत्व तयार करणे या सर्व गोष्टींवर अभ्यासक्रम केंद्रित आहे.