सी. एम. पुराणिक पूर्व प्राथमिक विभाग

सस्नेह नमस्कार,
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट सुभेदारवाडा विद्यासंकुल ह्या 131 वर्षांच्या ऐतिहासिक, शैक्षणिक परंपरा लाभलेल्या शाळेतच कल्याण शहरातील नागरिकांच्या आग्रहास्तव, शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने पूर्व प्राथमिक विभाग सुरू करण्याचे ठरले. ९ ऑगस्ट १९८४ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाल वर्गात प्रवेश देण्यास सुरुवात झाली.
१४ नोव्हेंबर १९८४ रोजी पूर्व प्राथमिक विभागाची स्थापना झाली. कल्याणकर नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे शाळेची चांगली भरभराट झाली. त्यामुळे पूर्व प्राथमिक विभागाचे वर्ग दोन अधिवेशनात भरू लागले.
गुरूवर्य कै.सी.एम.पुराणिक सर,कै.मणेरीकर सर,कै.माऊसकरसर,सौ.प्रतिभा बिवलकर, कै.विद्या बिवलकर ,कै.लता उपासनी, कै.कुमुद बोरकर, श्री.गावंडे,सौ.खानापुरकर , श्री.हुन्नरगीरकर , श्री.अ.र.कुलकर्णी, श्री.ब.न.नलावडे या उपक्रम समितीच्या प्रयत्नाने पूर्व प्राथमिक विभाग सुरू झाला.शाळेच्या सुरूवातीच्या काळात माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक श्री.माऊसकर सर , श्री.अ.र.कुलकर्णी व शैलजा मोडक हे शाळेचे कामकाज पाहात होते.
त्यानंतर श्रीमती. विजया व. आठवले यांनी १९९९ पर्यंत मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या निवृत्तीनंतर श्रीमती. अनुराधा उपासनी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१३ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत सौ. रसिका जांभुळकर मुख्याध्यापिका होत्या. जानेवारी २०२० पासून सौ. नीलिमा भाभे या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठी मोकळी जागा (घारपुरे सभागृह), प्रशस्त मैदान तसेच स्वच्छतागृह, स्मार्ट बोर्ड, खेळणी घर, मोकळ्या व हवेशीर प्रशस्त वर्गखोल्या, स्वयंपाकघर, कर्मचारी खोली आणि कार्यालय तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अशा चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.
पूर्व प्राथमिक विभागात ७ शिक्षिका, १ संगीत शिक्षिका, १ लिपिक, ५ सेविका आहेत. संगीत शिक्षिका हार्मोनियमवर अभ्यासक्रम, पुस्तकातील गाणी शिकवितात. तसेच संस्कृत विषय, संगणकाचे प्राथमिक ज्ञान दिले जाते.
आपल्या सर्व शिक्षिका प्रशिक्षित असून मुलातमूलं होऊन त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच सेविका (मावशी) सुद्धा मुलांची शाळेत प्रेमाने, आपुलकीने काळजी घेतात. दर बुधवारी शाळेत सेविका (मावशी) मुलांसाठी पौष्टिक आहार (खाऊ) तयार करतात..
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व विद्यार्थी सुसंस्कृत व्हावेत या दृष्टीने काही सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय उपक्रम आणि प्रत्येक महिन्यातील सण उत्सवांच्या अनुषंगाने उदा. योगदिन, वृक्षारोपण, गुरुपौर्णिमेनिमित्त बालसभा यात सूत्रसंचालन पासून -आभारापर्यंतचा सर्व कार्यक्रम विद्यार्थीच करतात. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त-नक्षत्रांचे देणे, दिवाळी पहाट/दिवाळी संगीत रजनी, सामूहिक वाढदिवस - विद्यार्थ्यांचे दर चार महिन्यांनी त्या त्या महिन्यात येणारे वाढदिवस गायत्री मंत्र म्हणून होम करून साजरे केले जातात.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास व्हावा आणि ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गायन स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, आनंदमेळा, बालजत्रा, वेगवेगळ्या विषयांवर दृष्य स्वरूपात प्रकल्प मांडून विद्यार्थ्यांना माहिती दिली जात असे माहिती दिली जाते.यात विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उपक्रम शाळेत राबविले जातात.
विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालक-शिक्षक संघातर्फे पालकांसाठीही निरनिराळे उपक्रम राबवीत असतो. उदा.- विद्यार्थी व महिला पालकांसाठी आरोग्य विषयक व्याख्याने, नाना-नानी डे असे निरनिराळे उपक्रम आपली शाळा राबवित असते. दरवर्षी वाढणारे गुणवत्तेचे निकष ही काळाची गरज ओळखून बालवाडीपासून सन २००९-२०१० दरम्यान सेमी इंग्रजीचे वर्ग तत्कालीन मुख्याध्यापिका मा.श्रीमती. अनुराधा उपासनी आणि शालेय समिती यांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने सुरू करण्यात आले. या सर्वांचा परिणाम म्हणून आज या वटवृक्षाखाली ३०० विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले करावे या साठी भक्कम पाया तयार करून घेण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात.
अशा विशाल वटवृक्षाला समृद्धी आणि यशाच्या उत्तुंग शिखराकडे वाटचाल करण्यासाठी संस्था, संचालक मंडळ पदाधिकारी व सदस्य यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक सतत प्रयत्नशील असतात. त्यांना सुयश मिळो हीच सदिच्छा.
धन्यवाद सौ. नीलिमा.न.भाभे मुख्याध्यापिकाज.ए.इ.ची पूर्व प्राथमिक शाळा, सुभेदार वाडा कल्याण (प.)
शालेय समिती
# | नाव | पदनाम |
---|---|---|
1 | श्री. संजय विश्वनाथ कानिटकर | अध्यक्ष |
5 | सौ. नीलिमा नरेश भाभे | कार्यवाह |
3 | श्री. सुरेश आर. जाधव | सदस्य |
3 | श्री दादासाहेब बी. यादव | सदस्य |
4 | श्रीमती अनुराधा अविनाश उपासनी | सदस्या |
6 | सौ अपर्णा प्रशांत पुराणिक/td> | शिक्षक सदस्या |
7 | सौ. उषा सुनील नागपुरे. | शिक्षकेतर सदस्या |
विद्यार्थी पटसंख्या | ||
---|---|---|
# | पट | संख्या |
1 | नर्सरी | २१ |
2 | छोटा शिशु | ११३ |
3 | मोठा शिशु | १६६ |
4 | एकूण | ३०० |
वर्ग विगतवारी | ||
---|---|---|
१ मोठा शिशु गट क्र १ २ सकाळ अधिवेशन | ||
२ छोटा शिशु गट क्र १ २ सकाळ अधिवेशन | ||
३ नर्सरी गट क्र १ सकाळ अधिवेशन | ||
४ मोठा शिशु गट क्र ३ ४ दुपार अधिवेशन | ||
५ छोटा शिशु गट क्र ३ ४ दुपार अधिवेशन | ||
६ नर्सरी गट क्र २ ३ दुपार अधिवेशन | ||