Ready Set Go


सी. एम. पुराणिक प्राथमिक विभाग
UDISE No.27210602101

शाळा ही व्यक्तिमत्त्व घडविणारे केंद्र आहे,

संस्थेचे आघ संस्थापक कै. गो.ना. अक्षीकर यांना प्रथम विनम्र अभिवादन! त्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात ज. ए. इ.संस्थेच्या निरनिराळ्या ठिकाणी शाळा काढल्या.सुरुवातीला माध्यमिक शाळा सुरू केल्या.

हायस्कूल कल्याणच्या शताब्दी वर्षात प्राथमिक शाळेचा पहिला विद्यार्थी हा माध्यमिक शाळेत येईल असे नियोजन केले.१७ जून १९८५ पासून प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली.यासाठी कै.गुरुवर्य सी.एम. पुराणिक सरांच्या पुढाकाराने व त्या वेळचे मुख्याध्यापक श्री मणेरीकर सर माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर व संस्था पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. यासाठी स्थानिक नागरिक व माजी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

प्राथमिक शाळेचा दर्जा सतत उंचावत आहे. शाळेत प्रशिक्षित शिक्षक वृंद आहेत.शाळेत विविध प्रकारचे उत्तम दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उपक्रम, प्रकल्प, उत्तम सहली, क्रीडा स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,आनंद मेळावा,तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित केली जातात.

काळाची गरज ओळखून शाळेने इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले. संस्कृत विषयाची गोडी लागावी म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून संस्कृत भाषेचे ही ज्ञान शाळेतर्फे देत आहोत.आपल्या शाळेत भारतीय संस्कृतीची जोपासना केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना निरनिराळ्या सणांची ओळख करून सण साजरे केले जातात. निरनिराळ्या स्पर्धा,शालेय बाह्य स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो व स्पर्धा परीक्षेत ही सहभागी केले जाते.

कोरोना महामारी चे संकट मार्च २०२० पासून सुरू झाले.व शाळा बंद झाल्या जून २०२० मध्ये आमच्या संस्थेचे संचालक श्री. पाठकसर श्री. सरदेसाई सर यांच्या प्रयत्नाने “मायक्रोसॉफ्ट टीम ॲप” घेऊन आम्ही जून २०२०-२१ मध्ये ऑनलाईन शाळा सुरू केली. पालकांची आर्थिक अडचण असूनही त्यांनी जमेल तसे शालेय फी भरून आम्हाला सहकार्य केले.

ऑनलाइन शाळेतही शालेय व सहशालेय उपक्रम तसेच शिक्षकांनी प्रत्येक सणांचे व्हिडिओ बनवून ऑनलाइन उपक्रम राबविले.अशी ही आमची शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.

धन्यवाद !!!!
सौ. कल्पना संजय पोतदार
मुख्याध्यापिका
ज.ए.इ.ची सी. एम. पुराणिक प्राथमिक शाळा, सुभेदार वाडा कल्याण (प.)

शालेय समिती कार्यकारीणी मंडळ
# नाव पदनाम
1 मा. श्री. प्रदीप विश्राम गोसावी शालेय समिती अध्यक्ष
2 मा. श्रीम.कल्पना सं. पोतदार कार्यवाह
3 मा.श्रीम.वैशाली व्ही पाटील शालेय समिती सदस्य
4 मा.श्रीम.अरुणा यु. पाटील शालेय समिती सदस्य
5 मा.श्री.धनंजय एन.पटवर्धन शालेय समिती सदस्य
6 मा.श्रीम.स्मिता फिरके शिक्षक सदस्या
7 मा.श्रीम.पल्लवी र. महिंद्रकर शिक्षकेतर सदस्या
शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारीणी मंडळ
# नाव पदनाम
1 श्री.राधाकृष्ण दि.पाठक अध्यक्ष
2 श्री.सुभाष चौधरी पालक सदस्या
3 सौ. अंजली साळवे पालक सदस्या
4 सौ. शैलजा गांधी/td> पालक सदस्या
5 सौ. प्रियंका बनसोडे पालक सदस्या
6 सौ. ज्योती शेंगाळ पालक सदस्या
7 सौ. स्वाती कावरे पालक सदस्य
8 सौ. जागृती बडगुजर पालक सदस्य
9 सौ.अमृता उमवणे पालक सदस्या
10 श्री. जव्वाद डोन स्थानिक प्रधिकरण सदस्य
11 श्री. दिनकर पाटील शिक्षण तज्ञ
12 श्रीम.नेहा कुलकर्णी सचिव
13 सौ. कल्पना पोतदार कार्यवाह
14 सौ. स्मिता फिरके शिक्षक सदस्य
15 कु. तन्मय दिनकर लांडे विद्यार्थी सदस्य
16 कु. रवी राधेश्याम रणबावळे विद्यार्थी सदस्य
विद्यार्थी पटसंख्या
# पट संख्या
1 १ ली २५३
2 २ री २७०
3 ३ री २६०
4 ४ थी २२६
5 एकूण १००९
वर्ग विगतवारी
सकाळ अधिवेशन- इ.१ ली ते ४ थी – ‘ब’ आणि ‘क’ वर्ग भरतात.
दुपार अधिवेशन- इ.१ ली ते ४ थी – ‘अ’ आणि ‘ड’ वर्ग भरतात.

प्राथमिक शाळेची वैशिष्ट्ये

इ. १ ली ते ४ थी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे दोन्ही सत्रात वर्ग भरतात
ई-लर्निग द्वारे शिक्षण
M.P.S.P, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी व गणित विषयांच्या स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे English Marathon इ. स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून उत्तम मार्गदर्शन केले जाते.
इ. १ ली पासून संस्कृत विषयाचे अध्यापन करण्यात येते.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्ता वाढीसह त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष.
शैक्षणिक साधने प्रत्येक विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष हाताळण्याची संधी.
पालक सभांचे आयोजन व कार्यक्रम.
बुलबुल प्रशिक्षण सुविधा (गाईड).
क.डों.म.पा. तर्फे भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन आणि बालमहोत्सव यामध्ये शाळेने भरघोस यश संपादन केले.
क.डों.म.पा. शिक्षण मंडळातर्फे प्राथमिक विभागास “आदर्श शाळा पुरस्कार”.
अनुभवी, तज्ञ तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षकवृंद.