कनिष्ठ महाविद्यालय
पालकांशी हितगुज
विद्यार्थी मित्र आणि समस्त पालक वर्गाला नमस्कार*
*2021-22 कॉलेज प्रवेशाबाबत * *( एम सी व्ही सी विभाग )*
मित्रांनो दरवर्षी *एस एस सी परीक्षा झाल्यानंतर* आपले शिक्षक प्रत्यक्ष भेट देऊन पुढील शैक्षणिक प्रवेशाबद्दल मार्गदर्शन करतात. परंतु कोरोनाच्या ह्या जागतिक संकटामुळे असे करणे शक्य नाही. अश्यातच कॉलेज बंद आहे , निकाल कधी लागणार ह्याची शाश्वती नाही. परिणामी सर्वत्रच काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदचा कालावधी जरी वाढत असला तरी सरकारच्या निर्णयांनुसार लवकरच निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे व त्यानंतर प्रवेश प्रक्रिया चालु होणार. सदर प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शासनाने घालुन दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करून कॉलेज प्रवेशाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
त्याकिरता *विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती उपलब्ध असणे* आवश्यक आहे. ज्यांना *आपल्या कॉलेजच्या MCVC ( Electronic Technology / Accounting & Office Management ) विभागामध्ये* प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर सदर माहिती घरी राहुनच भरून द्यावी जेणेकरून शिक्षक प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य वेळी संपर्क करू शकतील आणि पालकांना पाल्याच्या पुढील शिक्षणाबाबत चिंता करावी लागणार नाही.
माहिती भरताना काही अडचणी आल्यास खाली दिलेल्या नंबर वर शिक्षकांनी संपर्क साधावा.
*श्री कुलकर्णी : 8805965427*
*श्री पिंगळे : 9082400414*
*श्रीमती कंठे : 7208044295*
* धन्यवाद .. घरी रहा .. सुरक्षित रहा : अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या संधी :-
1)Apprenticeship Board, सायन मुंबई या कार्यालया मार्फत शिकाऊ उमेदवारी मिळू शकते विद्या वेतन रू. 1900/- 2)स्वयंरोजगार करु शकतात. 3)इलेक्ट्रॉनिक शाखेचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणाऱ्या कारखान्यात काम करु शकतो. 4)उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतो इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा विद्यार्थ्याला डिप्लोमा सेकंड इअर ला प्रवेश मिळतो तसेच F .Y. B .A. ला ही प्रवेश मिळतो. 5)अकाउंटिंग अँड ऑफिस मैनेजमेंट शाखेचा विद्यार्थ्याला ही F.Y.B.COM.ला प्रवेश मिळतो.