Ready Set Go


उच्च माध्यमिक विभाग

लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला 'सुभेदार वाडा' म्हणजेच आमचे ज. ए. इ. चे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कल्याण.

या वाड्यात १८९० साली आपल्या संस्थेने हायस्कूल शाळा सुरू केली. कल्याणकरांच्या मागणीमुळे १९८४ साली पूर्वप्राथमिक विभागाची आणि १९८५ साली प्राथमिक विभागाची स्थापना झाली. दरवर्षी लागणाऱ्या उत्कृष्ट निकालामुळे कल्याण शहरातील अत्यंत नामांकित शाळा म्हणून लवकरच ती नावारूपास आली.

बदलत्या काळाबरोबर पावले टाकणाऱ्या आपल्या सर्व माजी मुख्याध्यापकांच्या अथक प्रयत्नाने शाळा उत्कर्षाप्रत जाऊ लागली. अद्ययावत शिक्षण साधने आली. क्रीडाक्षेत्रात शाळा चमकू लागली आणि शताब्दी महोत्सवाकडे शाळेची वाटचाल चालू झाली.

शताब्दी महोत्सव समितीने विविध कार्यक्रम हाती घेतले. त्याचाच एक भाग गुरुवर्य कै. श्री. पुराणिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेस जोडून कनिष्ठ महाविद्यालय

कला शाखा व किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम इयत्ता ११ वी चा वर्ग सुरू केला. जेणेकरून परिसरातील विद्यार्थ्यांना स्वयं रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल.

आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देतात. विद्यार्थ्यांमध्ये सत्य, प्रामाणिकपणा, सद्गुण, मेहनत ,सर्जनशीलता इत्यादी गुण विकसित करून त्यांचे भविष्य उज्वल करण्यास साह्य करणे हे काम आमचे शिक्षक आत्मीयतेने करत असतात. म्हणून म्हणावेसे वाटते 'Education is the art of making man ethical.'

आपल्याकडे असलेल्या आर्टस् विभागामुळे विद्यार्थ्यांचा तात्विक पाया भक्कम होतो, वाचन जास्त प्रमाणात होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय लागते त्यांच्या कल्पना शक्तीचा विकास होतो आणि आपले विचार प्रभावी पणे मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.त्यामुळे भविष्यात त्यांना करिअरच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतात.

आर्टस् विभागा बरोबरच आमच्या कडे M. C. V. C. किंवा एच. एस. सी. वोकेशनल कोर्सेस देखील आहेत.

विद्यार्थ्यांना विशिष्ट व्यवसायासाठी दिले जाणारे खास प्रकारचे शिक्षण म्हणजे व्यायसायिक शिक्षण होय. हे शिक्षण सामान्य शिक्षणापेक्षा वेगळे असते.व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाच्या मिश्र शिक्षण पद्धती द्वारे दिले जाते. बौद्धिक शिक्षणा इतकेच महत्त्वाचे असणारे शिक्षण हातांना आणि डोळ्यांना देऊन आवश्यक कौशल्य प्राप्त करण्यावर भर दिला जातो.अशाप्रकारे विद्यार्थी व्यवसायभिमुख बनून समाजामध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करू शकतो Our focus is on both vocational and personality development of our students.

उच्च माध्यमिक विभागाकडून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. आणि अभिरुचीसंपन्न विद्यार्थी घडविण्यावर भर दिला जातो. एकंदरीतच शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविले जाणारे शिक्षण आमच्याकडे दिले जाते .

सरते शेवटी सांगावेसे वाटते की...

' मना घडवू संस्कार

करू स्वप्ने साकार

देऊ जीवना आकार'

धन्यवाद !

सौ. रंजना भरत पाटील
उपमुख्याध्यापिका / उपप्राचार्या,
ज.ए. इ. चे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,
सुभेदार वाडा, कल्याण

शाळा व्यवस्थापन व विकास समिती S. M. D. C. (इ.९वी ते १२ वी) शै. वर्ष २०२१-२२
# नाव पदनाम
1 प्राचार्य लक्ष्मण एम. भोये अध्यक्ष
2 उपमुख्याध्यापिका सौ. रंजना भरत पाटील सचिव
3 श्री. मनिष नाना पाटील (ज्येष्ठ शिक्षक) सचिव
4 सौ. हेमांगी सुधीर कुलकर्णी सदस्य (समाजशास्त्र अध्यापक)
5 सौ. विशाखा निलेश भोईर सदस्य (गणित अध्यापक)
6 सौ योगिता विजय येवले सदस्य (विज्ञान अध्यापक)
7 सौ. गीता प्रकाश भालेराव सदस्य (पालक प्रतिनिधी)
8 श्री. महेश लक्ष्मणराव गायकवाड सदस्य (पालक प्रतिनिधी)
9 श्री. अरुण पंढरीनाथ गिध स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य
10 श्री. डोन जव्हाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य
11 श्री. निवृत्ती गोविंद कौले सदस्य (अनु. जाती व जमाती)
12 सौ. पद्मजा वैष्णवप्रसाद रानडे सदस्य (महिला संघटना / बचत गट)
13 श्री. सुभाष हिरालाल जव्हेरी सदस्य (ग्राम संघ शिक्षण समिती / वार्ड)
14 श्री. दिलीप भिकाजी सातपुते सदस्य (शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी नामनिर्देशित केलेले विज्ञान तज्ञ)
15 श्री. अजित गोपाळ सहस्त्रबुद्धे सदस्य (कला तज्ञ)