Ready Set Go


माध्यमिक विभाग
UDISE No.27210602105

नमस्कार .

राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या आगरकर व चिपळूणकर यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचे विद्यार्थी कै.श्री.गो.ना. अक्षीकर यांनी शिक्षण प्रसार हेच आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. सन १८८९ च्या सुमारास कल्याण परिसरातील पालकांचा त्यांच्या मुलांबाबत शिक्षणाचा प्रश्‍न तीव्र झाला होता. कै.श्री.गो.ना.अक्षीकर यांच्या पुढाकाराने २ जानेवारी १८९० रोजी सुभेदार बिवलकर यांच्या वाड्यात हायस्कूल कल्याण या शाळेची स्थापना झाली.

१९८४ साली पूर्व प्राथमिक विभाग तर १९८५ साली प्राथमिक विभागाची स्थापना करण्यात आली. प्राथमिक शाळेतील पहिल्या तुकडीचे विद्यार्थी हायस्कूल कल्याणच्या शताब्दी वर्षात इयत्ता पाचवीत असतील अशा दूरदर्शीपणा दाखवून शालेय व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. १९९० साली शाळेच्या शताब्दीपूर्ती निमित्त उच्च माध्यमिक विभागाची म्हणजेच कला व MCVC विभागाची स्थापना करण्यात आली तर काळाची गरज ओळखून शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमाची स्थापना केली गेली.

शाळेचा अमृत महोत्सव, शताब्दी महोत्सव व शतकोत्तर रौप्य महोत्सव याचे साक्षीदार असलेले गुरुवर्य कै. श्री.सी.एम्. पुराणिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाची स्थापना करण्यात आली. बदलत्या कालौघाबरोबर अपेक्षित असलेले शैक्षणिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्राथमिक व माध्यमिक विभागात सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात करण्याचा सरांचा निर्णय शाळेच्या प्रगतीसाठी पूरक ठरला. कल्याण आणि परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने एमसीव्हीसी विभाग तसेच कला विभागाची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता.

इसवीसन १७६६ते १७६९ या कालावधीत बांधला गेलेला हा ऐतिहासिक सुभेदार वाडा जवळपास दोन शतके दिमाखात उभा होता. ऊन- पाऊस, वादळ वारा तसेच अनेक नैसर्गिक आपत्तींत या वाड्याची पडझड झाली आणि कल्याणातील मातब्बर समाजधुरिणांनी या वाड्याची पुनर्बांधणी करावी असे मत व्यक्त केले. याला मूर्तरूप देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली ती वंदनीय पुराणिक सरांनी. आज दिसत असलेली ही दिमाखदार वास्तू हे याचेच फलित. अशाप्रकारे हायस्कूल कल्याण विद्यासंकुलरुपी जगन्नाथाचा रथ चालवण्यासाठी आम्हाला गुरुवर्य पुराणिक सर यांचे कायम मार्गदर्शन लाभले.

श्री रा.वै. भिडे ,श्री गजानन र. केळकर, श्री र .वि. सोमण, श्री. भगवान चोळकर ,श्री. ज.य.दिक्षित श्री. मणेरीकर सर, श्री. उ.स. माऊसकर या आणि यासारख्या इतर अनेक मुख्याध्यापकांनी स्वतःच्या आचरणाने इतरांना मार्गदर्शन करून , त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करून, वेळप्रसंगी निग्रही पणे वागून व काही वेळा खंबीर निर्णय घेऊन शाळेच्या पूर्व परंपरा राखल्या. नवीन परंपरा जोपासल्या व शाळेच्या लौकिकात भर घातली. शाळेला खंबीर नेतृत्व दिले आणि शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलला.

आजमितीला या विद्या संकुलात ६५ वर्ग, २ सभागृह ,अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळासाठी प्रांगण आहे. याचा लाभ जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी घेत आहेत आणि त्यांना मार्गदर्शनाचे काम मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर तुकाराम मेटकरी उपमुख्याध्यापिका सौ रंजना पाटील , पर्यवेक्षक श्री. होडगर आर. बी., ५२ शिक्षक, ५ लिपिक , १ ग्रंथपाल,१ प्रयोगशाळा सहाय्यक,६ संगणक शिक्षिका , २ संगणक सेविका आणि ७ सेवक करीत आहेत.

आपली शाळा म्हणजे उपक्रमशील व्यवहार्य आणि व्यावसायिक शिक्षणाला दिशा देणारे केंद्र आहे. केवळ आणि केवळ विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ,विकासासाठी शाळेचा अभ्यास ,अभ्यासपूरक नियोजन, मन भारावून टाकणारा परिपाठ, चिंतनशील अभ्यास वर्ग, आदर्श वेळापत्रक, अभिनव अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि व्यक्तिमत्व घडवणारे वार्षिक नियोजन हे जाणीवपूर्वक केले जाते याचा मला अभिमान वाटतो. शाळेचा भविष्यकाळ उत्तरोत्तर असाच उज्ज्वल राहील अशी खात्री वाटते.

विराट विक्रम विभव होऊ दे

ध्यास उद्याच्या युवकांचा!

ज्ञान वसो, विज्ञान कळो,

उत्कर्ष होऊ दे राष्ट्राचा!

श्री . डी.टी .मेटकरी
मुख्याध्यापक/ प्राचार्य ,
हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कल्याण, सुभेदार वाडा

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सुभेदार वाडा

शालेय समिती दि. १ जानेवारी २०२५ पासून
# नाव पदनाम
1 श्री. राधाकृष्ण दिनकर पाठक अध्यक्ष
2 श्री. मेटकरी डी.टी पदसिद्ध कार्यवाह
3 श्री.राजेंद्र जयसिंग राजपूत सदस्य
4 श्री.विलास काशिनाथ गाजरे सदस्य
5 श्री.दिवाकर देविदास ठोंबरे सदस्य
6 श्री.पिंगळे एस. के. शिक्षक सदस्य
6 श्री.देशपांडे एम.बी. शिक्षकेतर सदस्य
विद्या समिती शै. वर्ष :- २०२५ - २६
# नाव पदनाम
1 श्री. ज्ञानेश्वर तुकाराम मेटकरी (मुख्याध्यापक) पदसिद्ध अध्यक्ष
2 श्रीम.नगराळे एन.एम. प्रमुख
3 श्रीम.कंठे डी.टी. उपप्रमुख
4 श्रीम.मयेकर सी.एस. सदस्य
5 श्री.काळे एस.आर. सदस्य
6 श्रीम कदम ए. पी. सदस्य
7 श्रीम.पाटील व्ही व्ही निमंत्रित
8 श्री.गाजरे विलास काशिनाथ सदस्य (शालेय समिती सदस्य)
विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समितीतील कार्यकारिणी मंडळ २०२५ - २६
# नाव पदनाम
श्री. अरुण पंढरीनाथ गौध अध्यक्ष
श्री. डी. टी. मेटकरी सचिव
श्रीम. मीनाक्षी डोईफोडे स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी
सौ. निशा हेमंत पाटील शिक्षक प्रतिनिधी
श्री. एस. बी. शेवाळे शिक्षक प्रतिनिधी
श्रीम. चेतना रामचंद्रन स्थानिक शिक्षक तज्ज्ञ
श्रीम. पूजा निलेश धबाले आरोग्य सेविका
श्रीम. सविता राजू पाटील अंगणवाडी सेविका
श्रीम. ज्योती सुरेश राठोड वकील
१० श्री. विवेक निंबालाल सोनावणे माझी विध्यार्थी
११ श्रीम. स्नेहल योगेश सोनावणे माझी विध्यार्थी
१२ श्री. उमाकांत यशवंत चौधरी व्यावसायिक प्रतिनिधी
१३ श्रीम. हर्षला राजेश म्हात्रे व्यावसायिक प्रतिनिधी
१४ श्री. पंकज भालचंद्र पाटील पोलीस पालक प्रतिनिधी
१५ डॉ. उमेश सूर्यवंशी वैद्यकीय प्रतिनिधी
१६ श्री. बाळकृष्ण ज्ञानेश्वर वाघ पालक प्रतिनिधी
१७ श्री. विश्वास खंडू जाधव पोलीसा उपनिरीक्षक
१८ श्री. सुरेश निकुळे पोलीस उपनिरीक्षक
१९ श्री. सागर रावजी धामोडे कैद्रप्रमुख
२० श्री. विकास चौधरी परिवहन प्रतिनिधी
शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक वर्ष २०२५-२६
# नाव पदनाम
१. श्री उमाकांत यशवंत चौधरी अध्यक्ष
२. श्रीम. संगीता संतोष धोंगडे उपाध्यक्ष
३. श्री . डी . टी . मेटकरी सचिव (मुख्याध्यपक)
४. श्रीम. शिल्पा मुकेश सोलंकी पालक प्रतिनिधी
५. श्रीम. कोनिका संदीप नाईक महिला प्रतिनिधी
६. श्रीम. सारिका संतोष मोगले महिला प्रतिनिधी
७. श्रीम. अश्विनी महेश जाधव महिला प्रतिनिधी
८. श्रीम. सविता रुपेश गायकवाड महिला प्रतिनिधी
९. श्रीम. रुपाली भाऊसाहेब गांजवे महिला प्रतिनिधी
१०. श्रीम. अश्विनी प्रदीप रावुरे महिला प्रतिनिधी
११. श्रीम. मीनाक्षी योगेश चौधरी महिला प्रतिनिधी
१२. श्रीम. इंदिरा सुशील जेठवा महिला प्रतिनिधी
१३. श्रीम. भारती संतोष शिंदे महिला प्रतिनिधी
१४. श्रीम. मीनली संदीप साळूंखे शिक्षकप्रतिनिधी
१५. श्री. मनीष नाना पाटील शिक्षकप्रतिनिधी
१६. श्री. शांताराम उत्तम पाटील शिक्षकप्रतिनिधी
१७. श्री. सुजित अरुण रणदिवे मानसोपचार तज्ञ
१८. श्री.डी.सी. पाटील स्थानिक शिक्षक तज्ञ
१९. मा. आम. श्री. विश्वनाथ दादा भोईर विधानसभा सदस्य
सखी सावित्री समितीतील कार्यकारिणी मंडळ २०२५-२६
tr>
# नाव पदनाम
१. श्री.उमाकांत यशवंत चौधरी अध्यक्ष
२. श्री.डी.टी.मेटकरी सचिव (मुख्याध्यापक)
३. श्रीम.प्रीती सुधीर भोसले महिला शिक्षक प्रतिनिधी
४. श्रीम.ज्योती नारायण बोडस महिला शिक्षक प्रतिनिधी
५. सौ.एस .आर .दाणी समुपदेशक
६. सौ.शुभांगी भातखंडे वैद्यकीय तज्ज्ञ
७. श्रीम.सविता राजू पायल अंगणवाडी सेविका
८. श्रीम.सुवर्ण दयानंद म्हात्रे पालक प्रतिनिधी
९. कु.सई धामापूरकर विद्यार्थी प्रतिनिधी
१०. कु.ऋतू बहिरट विद्यार्थी प्रतिनिधी
११. कु.सोहम सुतार विद्यार्थी प्रतिनिधी
१२. कु.पार्थ वनवे विद्यार्थी प्रतिनिधी
महिला तक्रार निवारण समितीतील कार्यकारिणी मंडळ. २०२५-२६
# नाव पदनाम
१. सौ.रंजना पाटील मॅडम अध्यक्ष
२. सौ.निर्मला नगराळे मॅडम उपाध्यक्ष
३. सौ . माया बेंद्रे मॅडम सचिव
४. डॉ. सौ. फडके वैद्यकीय अधिकारी
५. शाळेतील सर्व कार्यरत महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सदस्य
६. इ. ५वी ते १२वी तील अनुशासन प्रतिनिधी (विद्यार्थिनी)

माध्यमिक शाळेची वैशिष्ट्ये

इयत्ता पाचवी ते दहावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे दोन्ही सत्रांमध्ये वर्ग.
प्रशस्त वाचनालय ,सुसज्ज प्रयोगशाळा ,अद्ययावत संगणक कक्ष.
पालक सभांचे आयोजन.
अनुभवी तञ्ज्ञ तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षक वृंद.
कार्यतत्पर शिक्षकेतर कर्मचारी.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्ता वाढीसह त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष.
दहावीच्या निकालाचा चढता आलेख
NCC स्काऊट गाईड प्रशिक्षण सुविधा.
इ लर्निंग द्वारे शिक्षण.
विविध स्पर्धा व स्पर्धा परीक्षांचे आयोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
विविध क्षेत्रातील तञ्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शन पर व्याख्यानांचे आयोजन.
योगासने वारली पेंटिंग कार्यशाळांचे आयोजन
शालेय व्यवस्थापन समिती आणि शालेय विकास व व्यवस्थापन समिती यांचा शालेय नियोजनात सहभाग.