शाळेचीे वैशिष्ट्ये
वैशिष्ट्ये
१३१ वर्षांची शैक्षणिक परंपरा
ई-लर्निग द्वारे शिक्षण
परिपूर्ण प्रशस्त वाचनालय ,सुसज्ज प्रयोगशाळा ,अद्ययावत संगणक कक्ष
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागासाठी संगणकाची प्राथमिक ओळख.
बालवाडी ते दहावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध.
बालवाडीपासूनच संस्कृत व इंग्रजी विषय शिकवण्यास सुरवात.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्ता वाढीसह त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष.
शैक्षणिक साधने प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्यक्ष हाताळण्याची संधी.
अनुभवी तञ्ज्ञ तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षक वृंद.
क.डों.म.पा. शिक्षण मंडळातर्फे प्राथमिक विभागास “आदर्श शाळा पुरस्कार”
माध्यमिक विभागात डोंबिवली विज्ञान संमेलनात “विद्यार्थ्यांची उत्तुंग झेप थेट ISRO भेट”
NCC स्काऊट गाईड प्रशिक्षण सुविधा.
विविध स्पर्धा व स्पर्धा परीक्षांचे आयोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
विविध क्षेत्रातील तञ्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शन पर व्याख्यानांचे आयोजन.
योगासने, वारली पेंटिंग कार्यशाळांचे आयोजन.
एस. एस.सी. परीक्षे चा निकाल सातत्याने ९५% पेक्षा जास्त.
जुनिअर कॉलेज कला, MCVC विभाग (व्यावसायिक शिक्षण अंतर्गत अभ्यासक्रम – अकाउंटीग व ऑफिस मेनेजमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स )
ग्रंथालय
सुभेदारवाड्याच्या विद्या संकुलातील सर्व शिक्षकांना अध्यापनासाठी, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी, अभ्यासकांना चिंतनासाठी अशा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे संग्राह्य ग्रंथ ग्रंथालयात आहेत. १) चरित्र २) कथा संग्रह ३) संकीर्ण ४) साहित्य ५) कादंबरी ६) संदर्भग्रंथ ७) समाजशास्त्र ८) नाटक ९) काव्यसंग्रह १०) गोष्टी ११) इ.११ वी व १२ वी कला विभाग १२) इ ११ वी व १२वी Accounting & Auditing १३) इ ११ वी व १२वी Electronics १४) इंग्रजी १५) विज्ञान असे एकूण ८९०८ ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध आहेत.
वाचन कट्टा
वाचनालयातील सर्व पुस्तके हाताळण्याची सर्व विद्यार्थ्यांना संधी
ग्रंथालयात विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातील पुस्तकांची विद्यार्थ्यांशी मैत्री घडवून आणली जाते.
ग्रंथालयात विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातील पुस्तकांची विद्यार्थ्यांशी मैत्री घडवून आणली जाते. काही अवांतर वाचनाने पुस्तक परीक्षण अशा उपक्रमातून जिज्ञासू वृत्ती जागृत करून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली जाते. पर्यायाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
विविध बोलीभाषेची ओळख
विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तक पेट्यांची सुविधा
'पुस्तक मित्र' योजना
अभ्यासेतर पुस्तकांसंबंधी मार्गदर्शन
मराठी पुस्तक बक्षीस म्हणून देण्याची पद्धत
मराठी साहित्यिकांचे वैशिष्ट्यपूर्ण किस्से ऐकण्याची संधी
'लेखक तुमच्या भेटीला' उपक्रम
काव्य मंजुषा स्पर्धा
मातृभाषेतून व्यक्त होण्यासाठी अनेक नवोपक्रमांची योजना (लेखन, वाचन, भाषण इ. संबंधी)
शाळेच्या मधल्या सुट्टीत इयत्तेप्रमाणे ग्रंथ देवाणघेवाण करण्याचे वार