Ready Set Go


सी. एम. पुराणिक प्राथमिक विभाग

प्रवेशाच्या चौकशीसाठी खालील लिंकवर क्लिक करा


वार्षिक अहवाल

पालकांशी हितगुज

आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नेहमी विद्यार्थांच्या हितासाठी झटत असतात.

आपल्या शाळेत सर्व सोयीसुविधा म्हणजे प्रशस्त इमारत, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, प्रशस्त वर्गखोल्या आहेतच त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते. त्यासाठी वर्षभरातील अभ्यासक्रमाची आखणी केली जाते. आपली भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी पारंपारिक पद्धतीने सर्व सण – उत्सव विज्ञानाची सांगड घालून साजरे केले जातात.

तसेच शाळेत स्पर्धा परीक्षा, स्मार्त बोर्डची, सुविधा, विविध उपक्रम, शिक्षक – पालकांमधील संबंध व पालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा घेतल्या जातात.

जसा शाळेच्या इमारतीचा पाया भक्कम आहे, तसाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया ही भक्कम करण्याचे काम आमची शाळा करते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास ही उत्तम प्रकारे होतो.

आता सध्या लॉकडाऊनच्या काळात देखील आपले ओंनलाईन अध्ययन-अध्यापन अतिशय यशस्वीरित्या चालू आहे.

अशी आमुची शाळा –

लाविते लळा ही ---

जशी माउली बाळा ----

अशाप्रकारे विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आपल्या शाळेत मिळते.

धन्यवाद !!!