Ready Set Go


माध्यमिक विभाग

प्रवेशाच्या चौकशीसाठी खालील लिंकवर क्लिक करा


वार्षिक अहवाल

पालकांशी हितगुज

शालेय पालकांशी हितगुज,

२ जानेवारी १८९० रोजी स्थापन झालेल्या व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या अशा १३१ वर्षाच्या शाळेच्या इतिहासात आत्तापर्यंत असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या आपल्या हायस्कूल कल्याण सुभेदार वाडा या शाळेस पालक नेहमीच कौतुकाची थाप देत असतात. आपल्या शाळेने जी गुणवत्ता, विकास, उत्कर्ष साधला आहे त्यात पालकांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व परिवहन समिती यांच्या माध्यमातून पालक नेहमीच शाळेच्या संपर्कात असतात. तसेच शाळेत होणारा बक्षीस समारंभ, स्नेहसंमेलन व इतर उपक्रमात पालकांची उपस्थिती व उत्साह लक्षणीय असतो.

शाळेने सतत गुणवत्ताधारक शिक्षणाची कास धरलेली असल्याने पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आपल्या शाळेची प्राधान्याने निवड करतात. शाळेचे पोषक शैक्षणिक वातावरण, शाळेची सुसज्ज इमारत, सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,दृकश्राव्य साधने, प्रोजेक्टर व इतर भौतिक सुविधा मुबलक असल्याने पालकांमध्ये शाळेविषयी नेहमीच समाधान व्यक्त होत असते. विद्यार्थ्यांसाठी असणारे सहशालेय उपक्रम, विज्ञान प्रदर्शन, वेगवेगळ्या शाळाबाह्य परीक्षा, स्पर्धा उपक्रम, शालेय शिस्त व क्रीडा स्पर्धा यात पालकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग/सहकार्य मिळत असते. त्यामुळे शाळेचा उत्कर्ष हा अतिशय जलद गतीने सुरू आहे.

शालांत परीक्षेच्या निकालात कायम सातत्य ठेवणाऱ्या आपल्या शाळेच्या पुढील वाटचालीसाठी आपणा सर्वांचे सहकार्य आणि पाठिंबा अवश्य लाभावा ही सदिच्छा

श्री. पी. बी. पवार
पर्यवेक्षक, ज.ए.इ. चे हायस्कूल व ज्यु. कॉलेज कल्याण सुभेदार वाडा

मूल्यमापन व विद्यार्थी विकास

मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे तर एक वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अखंड निरंतर आहे.

शैक्षणिक मूल्यमापनामध्ये पूर्वी ठरवलेली, निश्चित केलेली शैक्षणिक उद्दिष्ट्ये किती प्रमाणात साध्य झाली हे ठरविले जाते. मूल्यमापन =मापन + मूल्यांकन

मूल्यमापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलांचे मापन केले जाते. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांची तीन विभागात विभागणी होत असते. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक. पूर्व प्राथमिक प्राथमिक विभागात मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होते. माध्यमिक विभागात लेखी परीक्षेत द्वारा मूल्यमापन होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण शाळेत घेतल्या जाणाऱ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा नाट्य स्पर्धा व विविध विषयांच्या बहि: शालेय स्पर्धाद्वारे निरीक्षणास येते व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करून त्या गुणांचा विकास घडवता येईल असे बघितले जाते.

तसेच क्रमिक विषयांचे मूल्यमापन केल्यामुळे विद्यार्थी कोणत्या विषयात, कोणत्या पाठ्य भागात मागे किंवा कमी पडलेला आहे त्या विषयीचे मार्गदर्शन करून विद्यार्थी अधिक प्रगत कसा होईल याकडे लक्ष देता येते.

दैनंदिन निरीक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले संघटनात्मक गुण ,नेतृत्वगुण, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, प्रसंगात्मक गुण लक्षात येतात व त्या पद्धतीने भावी आयुष्यात त्याचा उपयोग करून एखादा सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य शाळेकडून घडू शकते.

पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याच्या अंगी असणाऱ्या गुणांची पारख करुन त्याअनुषंगाने त्यास भावी जीवनातील मार्ग दाखवण्याचे काम करावे.

श्री.डि.सी. पाटील.
पर्यवेक्षक, ज.ए.इ. चे हायस्कूल व ज्यु. कॉलेज कल्याण सुभेदार वाडा