व्यवस्थापन डेस्क

डॉ. उल्हास कोल्हटकर, अध्यक्ष ज. ए. इ. दादर
इतिहासाच्या दृष्टीने सव्वाशे वर्षांचा कालखंड हा छोटा असला तरी एखाद्या संस्थेच्या इतिहासात तो मोठा आणि महत्त्व अधोरेखित करणारा असतो. सन १८९० मध्ये स्थापन झालेल्या 'सुभेदार वाडा, कल्याण' शाळेच्या इतिहासाचे ज. ए.इ च्या इतिहासात असेच अनन्यसाधारण महत्त्व आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये आणि केवळ ज. ए. इ. ची च नव्हे तर ऐतिहासिक कल्याण शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनाशीही या शाळेची नाळ घट्ट जोडली गेली आहे.केवळ ९६ विद्यार्थी सोबत घेऊन सुरू झालेली ही शाळा आजच्या घटकेला सुमारे ३५०० विद्यार्थ्यांकरीता आधारवड झालेली आहे हे कर्तृत्व तेथील शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे अन्य शालेय सहकाऱ्यांचे आणि कल्याणकरांचेही ! पुढे वाचा...

श्री. राधाकृष्ण पाठक, संचालक मंडळ सदस्य,ज. ए. इ. दादर
कल्याण या ऐतिहासिक शहरातील पहिली माध्यमिक शाळा म्हणून सुभेदारवाडा या शाळेस मान प्राप्त झाला.अर्थात सन१८९० हे माध्यमिक शाळेचे स्थापना वर्ष .काळाची गरज ओळखून सन १९८४-८५ या वर्षात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाची स्थापना करण्यात आली.सुभेदार बिवलकरांनी ही वास्तू नाममात्र किमतीत ज. ए. इ. या संस्थेस बहाल केली. याक्षणी काळाच्या विलक्षण ओघातही शाळेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक ( कला विभाग , अकाउंटिंग- ऑडिटिंग ,इलेक्ट्रॉनिक्स ) असे विभाग शाळेत बघावयास मिळतात. साधारणतः साडे तीन हजार विद्यार्थी सुभेदारवाडा या वास्तूत अध्ययन करीत आहेत.
शाळेची वैशिष्ट्ये

सांस्कृतिक कार्यक्रम
दीपपूजा

दिन विशेष
आदिवासी दिन

विज्ञान प्रदर्शन
ISRO भेट

अद्ययावत कॉम्प्युटर लॅब
अद्ययावत कॉम्प्युटर लॅब

योगासने
योगा

शाळा बाह्य उपक्रम
वृक्षारोपण

व्यवसाय मार्गदर्शन
व्यवसाय मार्गदर्शन

कौशल्य विकास
कौशल्याच्य आधारीत व्यवसाय